अंधार छटा, सूरज निकला… कमल खिला… ![]()
४६ वर्ष समर्पणाची, ४६ वर्ष भाजपाची
भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त चर्चगेट येथील के. सी. कॉलेज मध्ये आयोजित ‘कार्यकर्ता संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले.
आजचा दिवस हा केवळ उत्सवाचा नाही, तर त्या कोट्यवधी कार्यकर्त्यांच्या त्यागाला आणि समर्पणाला वंदन करण्याचा दिवस आहे, ज्यांनी शून्यातून हे विश्व उभे केले. आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींचे जागतिक नेतृत्व आणि आदरणीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या दूरदृष्टीने आज भाजपा ही जगातील सर्वात मोठी राजकीय शक्ती बनली आहे.
यावेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रविंद्र चव्हाण जी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, आमदार श्री. योगेश सागर जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, विधानसभेचे अध्यक्ष मा. श्री. राहुल नार्वेकर जी, विधान परिषदचे गटनेते मा. श्री. प्रवीण दरेकर जी, आमदार श्री. प्रसाद लाड जी, मुंबईच्या महापौर श्रीमती रितूताई तावडे, भाजपाचे इतर नेते, आमदार, मुंबई भाजपाचे सरचिटणीस, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबईचा प्रत्येक कार्यकर्ता हा एक ‘सैनिक’ असून, ‘राष्ट्र प्रथम’ हा मंत्र जपत आम्ही घराघरात पक्षाची विचारधारा पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. आजच्या या संमेलनातील अभूतपूर्व गर्दी आणि उत्साह आगामी विजयाचा संकल्प अधोरेखित करतो. सर्व देवतुल्य कार्यकर्त्यांना पुन्हा एकदा भाजपा स्थापना दिनाच्या मनापासून शुभेच्छा!
















Leave a Comment