मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय व मित्रपक्ष महायुतीचा जाहीरनामा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस जी, उपमुख्यमंत्री मा. श्री एकनाथ शिंदे जी, केंद्रीय मंत्री व आरपीआयचे अध्यक्ष मा. श्री रामदास आठवले जी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रसिद्ध करण्यात आला.
यावेळी मंचावर माझ्यासह भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री मा. श्री विनोद तावडे जी, राज्याचे कॅबिनेट मंत्री मा. श्री आशिष शेलार जी, माजी केंद्रीय मंत्री व राज्यसभा खासदार मा. श्री मिलिंद देवरा जी, माजी खासदार मा. श्री राहुल शेवाळे जी, राज्यमंत्री मा. श्री योगेश कदम जी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी जाहीरनाम्याच्या अनुषंगाने मुख्यमंत्री मा. श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी मुंबईकरांना महायुती सत्तेत आल्यास कोणकोणते लाभ मिळणार आहेत, याची सविस्तर घोषणा केली. “पाच वर्षांनंतर जनतेसमोर जाताना जाहीरनाम्यावर आधारित ॲक्शन टेकन रिपोर्ट फॅक्टशीटच्या स्वरूपात मांडू,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
मुंबईत राहणारा मराठी माणूस कोणत्याही परिस्थितीत मुंबई सोडून जाणार नाही, तर त्यालाच मुंबईत घर देण्याचा आमचा ठाम संकल्प आहे. बीडीडी चाळ, पत्राचाळ आणि विशाल सह्याद्री प्रकल्पांच्या माध्यमातून हे आम्ही प्रत्यक्षात करून दाखवले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
काही लोक केवळ मराठी माणसाच्या घराबद्दल बोलत राहतात; मात्र आम्ही बोलणारे नव्हे, तर वचन पूर्ण करणारे आहोत. म्हाडाच्या लेआउट्समध्ये पुनर्विकास करताना अधिकची जागा देण्यात येत असून, या प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यात आली आहे, हेही देवेंद्र फडणवीस जी यांनी स्पष्ट करत जाहीरनाम्यातील अनेक वचनांची माहिती दिली.











Leave a Comment