माहीम विधानसभा अंतर्गत प्रभाग क्रमांक १९० येथील भाजपा– शिवसेना– रिपाई महायुतीच्या उमेदवार श्रीमती शीतल गंभीर यांच्या निवडणूक कार्यालयास सदिच्छा भेट दिली.
या भेटीदरम्यान स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधत, प्रभागातील विकासकामे, नागरी सुविधा व जनतेच्या अपेक्षांवर सविस्तर चर्चा झाली. महायुतीच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
यावेळी जिल्हाध्यक्ष श्री नीरज उभारे, श्री गजेंद्र धुमाळे, श्री जतीन देसाई, श्री सचिन शिंदे, श्री महेश मुदलियार तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.










Leave a Comment