आज अंधेरी पश्चिम येथील ‘गुरुद्वारा श्री गुरू सिंग सभा’ (४ बंगलोज) येथे ‘पंजाबी लेडीज सिटीझन्स फोरम’ द्वारे आणि ‘नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल’ च्या सौजन्याने आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराला सदिच्छा भेट दिली. यावेळी उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली.
सर्वसामान्य मुंबईकरांना उत्तम आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी सामाजिक बांधिलकी जपत हा अत्यंत कौतुकास्पद उपक्रम राबवण्यात आला. याप्रसंगी गुरप्रीत कौर चड्ढा जी, गुरुद्वाराचे ट्रस्टी सुरी जी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. या स्तुत्य सेवाकार्याबद्दल सर्व आयोजकांचे व वैद्यकीय टीमचे मनापासून आभार!













Leave a Comment