महामानवाच्या स्मृतींना चैत्यभूमीवर विनम्र अभिवादन! ![]()
![]()
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५व्या जयंतीनिमित्त आज दादर येथील पवित्र ‘चैत्यभूमी’ स्मारकावर जाऊन महामानवाच्या स्मृतींना विनम्र अभिवादन केले. बाबासाहेबांनी दिलेला समता, बंधुता आणि न्यायाचा विचार हाच विकसित भारताचा पाया आहे.
याप्रसंगी माझ्यासोबत भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा श्रीमती चित्राताई वाघ, भाजप मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, मुंबई महिला मोर्चा अध्यक्ष श्रीमती योजना ठोकळे जी, नगरसेवक श्री. प्रतीकजी कर्पे, भाजपा मुंबई अनुसूचित मोर्चा अध्यक्ष श्री. शरद कांबळे आणि भाजपचे इतर पदाधिकारी व भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महामानवाच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी आणि समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत न्याय पोहोचवण्यासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत.


















Leave a Comment