अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणाऱ्या ‘अंधेरी सब-वे’ मध्ये पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न अत्यंत गंभीर आहे. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आज मंत्रालयात आदरणीय राज्यमंत्री (नगर विकास) श्रीमती माधुरी मिसाळ जी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत आमदार मुरजी पटेल जी यांच्यासह सहभागी झालो.
सदर बैठकीत अतिरिक्त महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले की, मुंबई शहराला पूरस्थितीतून मुक्त करण्यासाठी एक सर्वसमावेशक आराखडा (Comprehensive Plan) तयार करण्यात आला आहे. हा आराखडा IIT बॉम्बे यांनी तयार केला असून तो केंद्र सरकारकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
अंधेरीतील नागरिकांना दरवर्षी पावसाळ्यात होणारा त्रास कमी करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्यांचे (Storm Water Drains) सक्षमीकरण आणि आधुनिक पंपिंग यंत्रणेबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्त आणि संबंधित अभियंत्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.
अंधेरीकरांना पावसाळ्यात दिलासा मिळावा आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लवकरच या कामात गती येईल, असा आम्हाला विश्वास आहे.











Leave a Comment