लोअर परळ येथील पीव्हीआर फिनिक्स पॅलेडियममध्ये ‘द केरला स्टोरी २’ चा आयोजित करण्यात आलेल्या विशेष शो ला उपस्थित राहिलो. हा चित्रपट केवळ एक मनोरंजन नसून आपल्या राष्ट्राच्या सुरक्षिततेसाठी आणि जनजागृतीसाठी दिलेला एक महत्वपूर्ण संदेश आहे.चित्रपटाच्या प्रदर्शनावर आलेले संकट दूर करून न्यायालयाने जो निकाल दिला, तो केवळ चित्रपट सृष्टीचा विजय नसून प्रत्येक भारतीयाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आणि सत्याचा विजय आहे असे मला वाटते.कारण सत्य हे अमर असते,सत्याला कोणीही…कितीही… दाबण्याचा प्रयत्न केला, तरी शेवटी विजय सत्याचाच होतो, हे याप्रकरणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.या प्रसंगी माझ्यासह भाजपा मुंबई चिटणीस तथा स्वीकृत नगरसेवक श्री. प्रतीक कर्पे जी, चित्रपटाचे निर्माते श्री. विपुल शाह जी, दिग्दर्शक श्री. कामाख्या नारायण सिंह आणि सह-निर्माते श्री. आशिन ए. शाह तसेच चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.त्यांच्याशी संवाद साधताना या कलाकृतीमागील त्यांची मेहनत आणि जिद्द याबद्दल अधिक जाणून घेतले.
‘द केरला स्टोरी २’या धाडसी विषयांवर चित्रपट बनवून समाजात जागृती निर्माण केल्याबद्दल मी संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.











Leave a Comment