आज दादर येथील भाजपा मुंबई कार्यालयात मुंबई भाजपाच्या वतीने आयोजित “पंडित दीनदयाल उपाध्याय वक्ता प्रशिक्षण महाभियान २०२६” उत्साहात पार पडले. पक्षाची विचारधारा प्रभावीपणे मांडणे, जनतेशी थेट व परिणामकारक संवाद साधणे आणि समकालीन विषयांवर ठोस भूमिका मांडणे या दृष्टीने हे शिबिर अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.बदलत्या राजकीय व सामाजिक परिस्थितीत प्रत्येक कार्यकर्ता सक्षम आणि आत्मविश्वासपूर्ण वक्ता व्हावा, या उद्देशाने तज्ज्ञांनी संवादकौशल्य, विषय मांडणी, माध्यमांशी संवाद आणि संघटनात्मक शिस्त यावर मार्गदर्शन केले.यावेळी माझ्यासह आमदार श्री. पराग अळवणी जी, आमदार श्री. राजहंस सिंह जी, बृहन्मुंबई महानगरपालिका गटनेते श्री. गणेश खणकर जी, भाजपा मुंबईचे सरचिटणीस श्री. आचार्य पवन त्रिपाठी जी, सौ. श्वेता परूळकर जी तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.भाजपाची विचारधारा आणि जनसेवेची बांधिलकी अधिक जोमाने जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण सर्वजण एकत्रितपणे कार्यरत राहू, हा विश्वास आहे.














Leave a Comment