विकासाचा नवा टप्पा… सहकारातून सशक्त मुंबई!
कॅबिनेट मंत्री मा. ना. श्री. प्रविणभाऊ दरेकर यांच्या दूरदृष्टीतून साकार होत असलेले ‘सेवा, मार्गदर्शन व प्रशिक्षण केंद्र’ तसेच प्रतिक्षा नगर, सायन येथे मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. निर्मित ‘सहकार भवन’ या महत्त्वपूर्ण प्रकल्पांच्या उद्घाटन व भूमिपूजन सोहळ्यास उपस्थित राहिलो.
राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस जी यांच्या शुभहस्ते पार पडलेला हा सोहळा सहकार क्षेत्रासाठी एक नवा दिशा-दर्शक ठरणार आहे. सहकाराच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण साधत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सक्षम सेवा पोहोचवण्याचा हा प्रभावी उपक्रम आहे.
यावेळी कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी जी, कॅबिनेट मंत्री मा. श्री. मंगल प्रभात लोढा जी, आमदार श्री. प्रसाद लाड जी, आमदार डॉ. पंकज भोयर जी , आमदार श्री. कालिदास कोळंबकर जी, आमदार श्री. तमिळ सेल्वन जी, मुंबईच्या नवनिर्वाचित श्रीमती रितूताई तावडे यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहिले.
भाजपा मुंबई अध्यक्ष म्हणून, सहकार क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी आणि नागरिकांच्या आर्थिक प्रगतीस चालना देणाऱ्या अशा उपक्रमांना माझा नेहमीच ठाम पाठिंबा राहील. ‘सहकार भवन’ हा प्रकल्प भविष्यात विश्वास, पारदर्शकता आणि प्रगतीचा आदर्श ठरेल, याची मला खात्री आहे. सर्व संबंधितांचे मनःपूर्वक अभिनंदन! ![]()

















Leave a Comment