अंधेरी पश्चिम येथील बौद्ध सांस्कृतिक मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात माझ्या हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. पंडित विठ्ठल शंकर कुडत कुर्वे यांना “अंधेरी भूषण” पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांच्या कार्याचा गौरव करताना उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
या कार्यक्रमास नगरसेवक श्री दीपक कोतेकर, नगरसेवक श्री अनिष माकवानी, नगरसेविका श्रीमती सुधा सिंह , वॉर्ड अध्यक्ष श्री शंकर शिंदे तसेच मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वी आणि प्रेरणादायी ठरला.















Leave a Comment