किशोर कुमार गांगुली मार्ग, शिवाजीनगर नंबर १ येथील मुख्य व रहदारीच्या रस्त्यावर झालेल्या अतिक्रमणामुळे स्थानिक रहिवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या समस्येबाबत तातडीने तोडगा काढण्यासाठी स्थानिक नागरिकांची भेट घेऊन त्यांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेतल्या.
रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण लवकरात लवकर हटवून नागरिकांना आणि वाहतुकीला शिस्तबद्ध व मोकळा रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी रहिवाशांनी दिलेल्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतली आहे. संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून हे अतिक्रमण त्वरित हटवण्याचे निर्देश दिले आहेत.
या प्रसंगी नगरसेविका सौ. सुनीताताई मेहता, वॉर्ड अध्यक्ष श्री. निलेश गुरव आणि परिसरातील स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांच्या सुविधांसाठी आम्ही कटिबद्ध आहोत!













Leave a Comment