संत शिरोमणी श्री गुरु रविदास महाराज यांच्या ६५० व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे संपूर्ण भारतभर “समरसता संकल्प अभियान” राबविण्यात येत आहे. या अभियानाची सविस्तर माहिती, नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने भाजपा मुंबई कार्यालय, वसंत स्मृती (दादर) येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
या बैठकीस खा. डॉ. भोला सिंह जी (राष्ट्रीय सरचिटणीस, अनुसूचित जाती मोर्चा – भाजपा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच भाजपा मुंबईचे महामंत्री विनोद शेलार जी, आचार्य पवन त्रिपाठी जी, राजेश शिरवाडकर जी, महिला मोर्चा मुंबई अध्यक्षा योजना ठोकळे जी, प्रभाग समिती अध्यक्षा आशा मराठे जी आणि बेस्ट समिती सदस्य संतोष मेढेकर जी यांची विशेष उपस्थिती होती. या प्रसंगी मुंबईतील सर्व प्रमुख पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, जिल्हा महामंत्री, अभियानाची मुंबई व जिल्हा समिती तसेच अनुसूचित जाती मोर्चाचे मुंबई व जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते.














Leave a Comment