एक अविस्मरणीय आणि चैतन्यमयी संध्याकाळ! ![]()
आजची तरुणाई तंत्रज्ञानाशी जोडलेली असली, तरी त्यांच्या मनात आपल्या महान परंपरांची ओढ कायम आहे, हेच आजच्या ‘Bhajan Jamming Concert’ मध्ये प्रकर्षाने जाणवले.
आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजींनी ‘मन की बात’मध्ये मांडलेल्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवून, तरुणांना भक्तीमार्गाकडे वळवण्याचे अत्यंत कौतुकास्पद कार्य BJYM मुंबईने केले आहे. गोरेगावच्या नेस्को केंद्रात हजारो तरुणांचा उत्साह पाहून आपली संस्कृती सदैव प्रवाही असल्याचे सिद्ध झाले.
भारतीय जनता युवा मोर्चा मुंबईचे अध्यक्ष श्री. दीपक सिंह जी आणि त्यांच्या टीमने आयोजित केलेली ही चैतन्यमयी संध्याकाळ खरोखरच अविस्मरणीय ठरली. अशा उपक्रमांतूनच एक वैचारिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या सक्षम पिढी घडेल, याची मला खात्री आहे. आपण सर्वांनी अशा उपक्रमांना पाठिंबा देऊन आपल्या गौरवशाली हिंदू संस्कृतीचा वारसा अधिक वृद्धिंगत केला पाहिजे.
यावेळी माझ्यासह कॅबिनेट मंत्री मा. श्री. आशिष शेलार जी, महापौर श्रीमती रितूताई तावडे, भाजपा मुंबईचे सरचिटणीस आचार्य पवन त्रिपाठी जी, सभागृह नेते श्री गणेश खणकर जी, नगरसेवक श्री. तेजिंदर सिंह तिवाना जी, अन्य नगरसेवक तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते व सामान्य जनता मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जय हिंद, जय महाराष्ट्र!


















Leave a Comment