संस्कृती महाराष्ट्राची… परंपरा आपल्या सणांची! ![]()
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या पावन पर्वावर, अंधेरी (पश्चिम) येथील डी. एन. नगरमधील गणेश चौक येथे ‘संस्कृती महाराष्ट्राची’ आयोजित भव्य शोभायात्रेला नगरसेवक श्री. दिपक कोतेकर यांच्यासह उपस्थित राहून, गुढीपूजन आणि पालखीचे दर्शन घेतले.
डी. एन. नगरमध्ये आज खऱ्या अर्थाने अवघा महाराष्ट्र अवतरला होता. ढोल-ताशांचा कडकडाट, पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले अबालवृद्ध, माता-भगिनींचा उत्साह आणि लेझीमचा ताल… या वातावरणाने एक अभूतपूर्व ऊर्जा निर्माण केली.
आपली समृद्ध संस्कृती आणि परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचे हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. या भव्य शोभायात्रेचे आयोजन केल्याबद्दल ‘संस्कृती महाराष्ट्राची’ संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आणि उत्स्फूर्तपणे सहभागी झालेल्या सर्व अंधेरीकरांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.
ही नवीन पहाट आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि उत्तमोत्तम आरोग्य घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
हिंदू नववर्ष आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा!











Leave a Comment